राधा कृष्ण वधु वर सूचक केंद्र मध्ये आपले स्वागत आहे.

संस्थापक अध्यक्ष - विठ्ठल पाटील संस्थेचे स्थापना सन २००६ साली झाली. संस्थेचे सर्व धर्मीय वधु वर सूचक केंद्र असून संस्था प्रत्येक समाजाचे वेगवेगळे मेळावे आयोजित करीत असते. संस्थेला चांगल्याप्रकारे काम करता यावे म्हणून व आमच्या सभासदांना चांगली सेवा देता यावी म्हणून संस्थेने प्रत्येक समाजातील वधु वरांची वेगळी फ़ाईल तयार केली आहे. त्यामुळे वधु वरांना लवकर स्थळे निवडता येतात तसेच संस्था महिला बचत निर्मितीचे कामे करीत असुन संस्था शासनाच्या वतीने संपूर्ण स्वच्छता कार्यक्रम राबवित असून घर तेथे स्वच्छालय बांधण्यास व ते वापरण्यास कुटुंबाना व गावातील नागरीकांना प्रवृत्त करीत आहे. त्याचप्रमाणे संस्था अंगणवाडी, बालवाडी, मराठी शाळा, माध्यमिक शाळांना भेटी देवून विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून सांगून आपले स्वताचे घर घराचा परिसर, शाळेचा परिसर स्वच्छ ठेवणे बाबत प्रभोधनाने मार्गदर्शन करीत आहे. त्याचप्रमाणे संस्था इको-व्हिलेज बाबत मार्गदर्शन करीत असून ग्रामपंचायतना व गावकऱ्यानां जास्तीत जास्त झाडे लावण्यासाठी व ती जगविण्यासाठी प्रभोधन व मार्गदर्शन करीत आहे. संस्था अगरबत्ती तयार करणे , मेणबत्ती तयार करणे, आळीबी (मशरूम) ची लागवड करणे, बंधीस्थ शेली पालनाचे प्रशिक्षण देणे, व प्रशिक्षण घेतलेल्यांना प्रमाणपत्र देणे, इत्यादी काम करीत असते.


वैशिष्ट्ये

  • सर्व समाजातील वधु-वरांची छायाचित्रांसह संपूर्ण माहिती.
  • शुल्क आकारणी नाममात्र.
  • विवाह जुळवून देण्यासाठी प्रयत्न.

संस्थापक अध्यक्ष

विठ्ठल पाटील.